WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

टाकला बॉम्ब अन उध्वस्त केले दहशतवादी तळ.... जशाच तसे दिले उत्तर

Image

मिराज नेमके काय....

सुरज चाटे वणी :- भारतीय वायूसेनेने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद च्या तळांवर हवाई हल्ला केला. भारतीय वायूसेनेच्या 'मिराज २०००' जातीच्या १२ विमानांनी जैशच्या तळावर १ हजार किलोचे बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. या हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'मिराज २०००' या विमांनाची वैशिष्ट्य जाणून घेऊया -

मिराज २००० हे भारतीय वायूसेनेचे लढाऊ विमान आहे. ते फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशनद्वारे बनवण्यात आले आहे. मिराज २००० चौथ्या जनरेशनचे मल्टिरोल, एकेरी इंजिन लढाऊ विमान आहे. या विमानाची पहिली हवाई उड्डाण १९७० मध्ये झाले होते. हे फायटर प्लेन ९ देशात सेवा पुरवतो आहे. या विमानात आतापर्यंतर बऱ्याच वेळा अपडेशन झाले आहे. पाच पॉईंट्समध्ये जाणून घ्या पाकवर हल्ल्यासाठी का वापरले 'मिराज २०००' -

१. मिनिटाला १८ रॉकेटचा मारा करण्याची क्षमता

मिराजमध्ये प्रती मिनीटाला ६८ मिमिचे १८ रॉकेट सोडण्याची क्षमता आहे.

२. क्षणात सव्वाशे गोळ्यांचा मारा

३. ... यापेक्षा आहे खास अमेरिकेच्या एफ-१५ आणि एफ-१६ या विमानांच्या तोडीची मोजकीच विमाने जगात आहेत. त्यात फ्रान्सचे मिराज-२००० आणि राफेल, युरोपीय देशांनी एकत्रितपणे विकसित केलेली युरोफायटर टायफून आणि टॉरनॅडो, रशियन मिग-२९ आणि सुखोई-२७/३०, स्वीडनचे ग्रिपेन या विमानांचा समावेश होतो.

४. ताशी वेग २३३६ किलोमीटर मिराज-२००० वजनाला हलके, आकाराने नीटनेटके, वेगवान, जलद आणि संहारक लढाऊ विमान आहे. त्याला टेल विंग्ज नाहीत. त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) असल्याने त्याला वेगाने हवाई कसरती तसेच डावपेच करण्यास मदत मिळते. त्याची स्नेक्मा एम-५३ पी-२ टबरेफॅन इंजिने वजनाला हलकी, सुटसुटीत आणि प्रभावी आहेत. त्यामुळे मिराज-२००० विमानांना ताशी कमाल २३३६ किमी इतका वेग मिळतो. त्याचा पल्ला १८५० किमी असून ते एका मिनिटात ५६ हजार फूटांची उंची गाठू शकते.

५. शक्तीशाली रडार यंत्रणा मिराजवरील शक्तिशाली डॉप्लर रडार एकाच वेळी २४ लक्ष्यांचा माग काढू शकतं. त्याची ‘लुक डाऊन, शूट डाऊन’ क्षमता त्याची लक्ष्ये टिपण्यास मदत करते. मिराजवरून अण्वस्त्रांसह, लेझर गायडेड बॉम्ब, स्मार्ट बॉम्ब, मात्रा मॅजिक आणि मायका ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि एक्झोसेट ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागता येतात. मिराजच्या कॉकपीटमध्ये लागलेल्या स्क्रीनमध्ये उड्डाणावर नियंत्रण, नेव्हीगेशन आणि लक्ष्य टिपण्याची साधणे तसेच शस्त्रास्त्राद्वारे मारा करण्यासंबंधी माहिती दिसते. मिराजमध्ये शस्त्र वाहून नेण्यासाठी ९ हाय पॉईंट्स दिले आहेत. यामध्ये ५ प्लेनच्या खाली तर २ दोन्हीकडील पंखांवर देण्यात आले आहे. हे विमान २ अंतर्गत हेवी फायरिंग करणाऱ्या ३० मिमि बंदुकांनी सज्ज आहे. हवेतून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रांमध्ये MICA मल्टिगेट एअर-टू-एअर इंटरसेप्ट आणि कॉम्बेट मिसाइलचा समावेश आहे. याशिवाय इतरही शस्त्रास्त्रे नेण्याची क्षमता मिराज २००० मध्ये आहे.

'मिराज २०००' ची वैशिष्ट्य -

- हे लढाऊ विमान १९८५ मध्ये भारतीय वायूसेनेत दाखल झाले.

- विमानाची लांबी ४७ फुट

- खाली वजन ७ हजार ५०० किलो

- स्फोटके भरल्यानंतर १३ हजार ८०० किलो वजन

- विमानाचा प्रति तास वेग २ हजार ३३६ किलोमीटर

- प्रती मिनीटाला १२५ गोळ्या झाडण्याची क्षमता

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share