WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड : १४ जणांना घेतले ताब्यात

Image

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन पाच वर्षे झाली आहे. पण आता तरुणांनी आपला मोर्चा इतर व्यसनांकडे वळवला आहे. चंद्रपुरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड मारली आणि १४  जणांचा ताब्यात घेतले आहे.

शहरातील दाताळा मार्गावर उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गोल्डन रेस्टॉरंट या हॉटेलवर धाड घालून इथला हुक्का पार्लर पोलिसांनी उध्वस्त केला आहे. याठिकाणी काही बड्या घराची मुलं हुक्का पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रामनगर पोलिसांच्या पथकाने यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान सुमारे १४ मुलं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यात काही अल्पवयीन आहेत.

धाडी दरम्यान हुक्का पॉटस, विविध फ्लेवर्स चे तंबाखू व इतर सामग्री देखील ताब्यात घेण्यात आली आहे. गोल्डन रेस्टॉरंट हे ठिकाण याआधी बार -रेस्टॉरंट होते. दारूबंदी नंतर याचे हॉटेलमध्ये रुपांतर झाले. होते. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR