WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोषण आहार योजनेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या केळीचे वितरण

Image

कोरपना तालूक्यातील इंजापूर येथील अंगणवाडी केंद्रात दिनांक 5 मार्च रोजी लहान मुलांना तसेच पाल्यांना केळी वाटप करण्यात आली.

त्यात केळी निवळ खाण्याजोगत्या नसल्याची ओरड ग्रामस्थांनी व्यक्त केली असताही त्या केळींचे वाटप करण्यात आले.

केळी ही काळी होऊन सडलेली असतानाही वाटप करण्यात आली, यात आदीवासी पेसा गावात ए पी जे अब्दूल कलाम पोषण आहार योजनेच्या नावाखाली निकृष्ट केळी देण्यात येत आहे. येथील अंगणवाडी सेविका सौ.मीराबाई चिंचोलकर व मदतनीस सौ.गीता पिंगे यांनी हा प्रकार नेहमीस सुरू केला आहे. अंगणवाडीतील सेंविकांचा हा भोंगळ कारभार गावातील कमळ रामा पेंदोर ,धनेश्वर धुर्वे ,कविता कांबडे , रुखमाबाई राऊत यांना समजताच युवक कांग्रेसचे राजुरा विधानसभा महासचिव विलास मडावी सदर अंगणवाडी केंद्राला भेट दिली, आणि इंजापूर येथील अंगणवाडीतिल हा सेविकांचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच यातील दोषींवर कारवाई करून निलंबीत करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......