WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान

Image

ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात ६१ व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी  आणि  ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यावेळी उपस्थित होते.

६१ व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी  देशभरातून ५ हजार कलाकारांचे अर्ज  प्राप्त झाले होते. यातील १५ सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. २ लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टचे तर मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, पटना, कोलकाता, भुवनेश्वर, खजुराहो येथील चित्रप्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. २०१७ मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.

मुंबईतील डोंबिवली(पूर्व)येथील सागर कांबळे यांना पेंटींग श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून क्रिएटिव्ह पेंटींगचे शिक्षण पूर्ण करून सागर कांबळे यांनी कला क्षेत्रातील प्रवास सुरू केला. देशभरात आयोजित क्रिएटिव्ह पेंटींगच्या कार्यशाळांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. देश-विदेशातील महत्वाच्या संस्थांच्या वतीने आयोजित प्रदर्शनांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २४ हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मुंबईच्या सायन येथील  रतनकृष्ण साहा यांना मूर्ती कलेतील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आले. साहा यांनी बडोदा येथील एम.एस.विद्यापीठातून मूर्तीकलेचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, कोलकाता या शहरांमध्ये त्यांनी मूर्तीकला प्रदर्शनी लावली. ब्रिटेन आणि अमेरिकेतील मूर्तीकलेच्या समूह प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला. मूर्ती कलेतील योगदानासाठी त्यांना विविध राज्यांचे पुरस्कार व शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.

मुंबईतील घाटकोपर(पश्चिम) येथील दिनेश पांड्या यांना आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी  शिक्षण पूर्ण केले. मुंबई, बेंगळूर, चेन्नई आणि लंडनमध्ये त्यांनी चित्रप्रदर्शन लावले. त्यांनी देश-विदेशातील १५ समूह चित्रप्रदर्शनात सहभाग घेतला. १९८९ मध्ये त्यांना ब्रिटीश कौन्स‍िलची फेलोशिप मिळाली आहे. 

राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या वतीने दिल्लीतील मुख्यालयात ४ ते २२ मार्च २०२० दरम्यान आयोजित ६१ व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी प्रदर्शनीत पुरस्कारप्राप्त १५ कलाकारांसह एकूण २८४ कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.