WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक वास्तव ! शासकीय धोरणातील त्रुटींचा गैरफायदा

Image

कोरपनासध्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्व रेती लिलाव बंद स्थितीत असून गावपातळी ते जिल्हापातळीवर सुरु असलेल्या विविध विकास कामांकरिता लागणारी सापडेल तिथे अवैध उत्खनन करून रेती पुरविण्याकरिता गावोगावी एका राजकीय पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांनी मिळून मोठे रॅकेट उभे केले असून या तस्करीतून अवाजवी पेक्षा जास्त भावात रेती विक्री करून शासनाचा महसूल बुडवीत असल्याचा प्रकार टॅक्टर मालक - तलाठी - मंडळ अधिकारी - तहसीलदार यांचेशी साठगाठ करून नांदा फाटा येथील एक व्यक्ती या टॅक्टर मालकांना अभय पुरवीत असल्याचे परिसरात चर्चिले जात आहे.

तालुक्यात रेती तस्करांचे वाढते साम्राज्य : एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मोठे रॅकेट :100पेक्षा अधिक टॅक्टर मालकांनां नांदा फाट्यातून अभय !

कोरपना तालुक्यातील काही बांधकाम ठेकेदार व 30 पेक्षा अधिक ट्रॅक्टर मालकांनी हातमिळवणी करून तामसी, इरई, भोयेगाव, गुडगाव -बंडा (सांगोळा ) वनोजा, कोळशी, तुलसी या गावालगत असलेल्या वर्धा व पैनगंगा नदीपात्रात लगतच्या शेतमालकांशी संगनमत करून आजूबाजूच्या आडमार्गाने जेसीबी च्या साहाय्याने पहाड खोदून समतल रस्ते तयार केले आहेत.

या आड रस्त्यांनी दिवस रात्र शेकडो ट्रिप रेती उत्खनन, वाहतूक करून बांधकाम ठेकेदारांना पुरविल्या जात आहे. दिवसाढवळ्या एवढ्या मोठया प्रमाणात तस्करी सुरु असून सुद्धा महसूल विभाग याबद्दल अनभिज्ञ कसा, या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी यावर डोळझाक का करीत आहेत हा यक्ष प्रश्नचिह्न आहे.

या रॅकेट मधील अधिकतर ठेकेदार व ट्रॅक्टर मालक एका राजकीय संघटनेचे कार्यकर्ते असून, आमचे सर्वांशी संगनमत असल्याचे हे टॅक्टर मालक स्वतः परिसरात सांगत काल दिनांक 2 मार्च 2020 रोजी सांगोळा गावानजीक असलेल्या पैनगंगा नदीपात्रात (गुरगाव -बंडा ) येथे सुरु असलेल्या अवैध उत्खननाची माहिती घेण्याकरिता गेलेल्या काही माध्यम प्रतिनिधींच्या माहितीदार सहाय्यकास या टॅक्टर मालकांनी मारहाण करून टॅक्टर अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात ट्रॅक्टर ची चाबी काढण्यात यशस्वी झाल्याने अनुचित प्रकार घडला. या आधीच्या रात्री सुद्धा रात्री सुरु असलेल्या वाहतुकीबद्दल विडिओ बनविण्यास थांबून असलेल्या काही प्रतिनिधींवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

याच व्यक्तीने सर्व तस्करांना अभय दिले असून स्वतः सुद्धा आजूबाजूच्या गावातील बांधकामाच्या कामात पार्टनर असल्याने रेती विक्री करीत असून, परिसरातील इतरही तस्करीरांचा सरगनाह बनत "दारू विक्रेत्यांपासून तर रेशन दुकानदारांपर्यंत याच्या अभयाचे भय असल्याचे " परिसरात चर्चेत आहे.

या सर्व बाबींपलीकडे शाशनाच्या रेती घाट लिलाव प्रक्रियेतील चुकीच्या धोरणांमुळे रेती अभावी विकासकामांची गती मंदावली जाणार नाही हा मुद्दा केंद्रास्थानी ठेऊन महसूल प्रशासनाने योग्य पाऊले उचलणे आवश्यक असून धोरणातील त्रुटींमुळे सर्वच क्षेत्रातील वाढते अवैध उत्खनन व तस्करी चे प्रमाण नियंत्रणात येऊ शकेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR