WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे

Image

बॅंक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी 11 मार्चपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. मुंबईत बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बॅंक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात आज बैठक झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांना बॅंक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळे 11 मार्चपासून पुकारण्यात आलेला संप स्थगित करण्यात आला. ही माहिती इंडियन बॅंक असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी दिली. तसेच 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान पुकारण्यात आलेल्या संपामुळे ग्राहकांची मोठी कोंडी झाली असती. कारण बॅंक कर्मचाऱ्यांनी संपासाठी हा कालावधी निवडला. त्यानंतर 14 मार्चला दुसरा शनिवार असल्याने आणि 15 मार्च रोजी रविवार असल्याने बॅंका बंद असणार आहेत. तर 10 मार्च रोजी होळीची सुट्टी बॅंकांना असल्याने बॅंका बंद असणार आहेत. जर संप स्थगित झाला नसता तर 10 मार्च ते 15 मार्च म्हणजेच सलग सहा दिवस बॅंका बंद राहिल्या असत्या. मात्र संपाला स्थगिती दिली गेल्याने आता असे होणार नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.