WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Image

कुमार अमोल (सह्याद्री.न्यूज)

मारेगाव- हंगामी पिकांना पाणी द्यायला शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दि. 28 फेब्रु. 2020 रोजी 10:30 वाजताच्या सुमारास ही घटना आसन (उजाड) शेत शिवारात घडली आहे. विलास नामदेव बरडे (वय 53) असे मृतकाचे नाव असून ते वणी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवाशी आहेत.

सूत्राच्या माहितीनुसार विलास बरडे यांचे शेत आसन (उजाड) या शिवारात आहे. त्याकरिता ते उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते, पिकांना पाणी देण्यासाठी ते बोरवेल ची बटन मारली आणि त्यांना अचानक विजेचा शॉक लागला व ते जागीच मृत्यू मुखी पडले. सोबत कोणी नसल्याने ते तिथेच पडून राहिले. मात्र सकाळ पासून शेतात गेले परंतु अजूनही घरी परत आले नसल्याने घरच्यांना राहवलं नाही आणि ते जाऊन बघतात तर बरडे हे विजेच्या खांबा जवळ मृत अवस्थेत पडून आढळले, या घटनेची वार्ता परिसरात पसरताच सोनेगावात शोककळा पसरली. त्यांचे पश्चात पत्नी आणि दोन मुली असा आप्त आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.