WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मीनाक्षी गोरंटीवार यांना सर्वोत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार

Image

सागर मुने, वणी

" आम्ही लेखिका" या आंतरराष्ट्रीय संस्थेची जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे, आयोजित राज्यस्तरीय पहिले स्वयंसिद्धा महिला साहित्य संमेलन 9 फेब्रुवारीला पुसद येथे संपन्न झाले .

आम्ही लेखिका जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे आयोजित या पहिल्या राज्यस्तरीय महिला संमेलनात महाराष्ट्रातील नवोदित तसेच ज्येष्ठ महिला साहित्यिकांनी सहभाग घेतला होता.

या संमेलनात विविध क्षेत्रातील एकूण एकोणवीस मान्यवरांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात वणी येथील लेखिका कवयित्री मीनाक्षी गोरंटीवार यांना सर्वोत्कृष्ट लेखिका म्हणून स्वयंमसिध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका विजयाताई मारोतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक आम्ही लेखिका संस्थेचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार मोहनजी कुलकर्णी, सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अमृता उत्तरवार, सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार ,गिरीश भांडवलकर पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे आम्ही लेखिका जिल्हाध्यक्ष निशा डांगे तसेच रोहिणी पांडे उपस्थित होत्या.

दुसऱ्या सत्रात कथाकथन व बहारदार कविसंमेलन झाले. राज्यभरातील महिला साहित्यिकांनी या संमेलनात मोठया प्रमाणात सहभाग घेतला.

मीनाक्षी गोरंटीवार यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराचे श्रेय त्या आपल्या कुटुंबियांना , व आपल्या स्नेही जणांना देतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.