WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गुणवत्तेचा ध्यास घेऊन वणी नगर परिषदेचे शिक्षक वाभलेवाडीत

Image

वणी:-

संपूर्ण देशात गुणवत्तेचा दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाची असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाभळेवाडी मध्ये सुरू असलेल्या प्रयोगांचा अभ्यास करण्यासाठी वणी नगर परिषदेचे शिक्षक आज दि. 19 फेब्रुवारीला वणीवरून निघाले आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देण्यासाठी वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिक्षण सभापती अक्षता चव्हाण, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद मराठी शाळांची स्थिती दयनीय होत आहे. समाजाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे ओढा वाढल्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी वणी नगर परिषदेमध्ये कार्यरत शिक्षक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिक्षण सभापती अक्षता चव्हाण, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, प्रशासन अधिकारी संजय पवार यांच्या प्रेरणेने वणी नगर परिषदेच्या मराठी शाळेमधील दर्जेदार गुणवता निर्माण करण्यासाठी सर्व शाळा पूर्णपणे डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाभळेवाडी या नाविन्यपूर्ण शाळेचा अभ्यास करण्यासाठी हे शिक्षक वाभळेवाडी शाळेला भेट देण्यासाठी निघाले आहेत.

या अभ्यास दौऱ्यात राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन कासावार, वसंत गोरे, बंडू कांबळे, मीना काशीकर, वेणू कोटरंगे, सिंधू गोवारदीपे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम इत्यादी 21 शिक्षक जात आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.