WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक:नागपुरात सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरवर ॲसिड हल्ला

Image

एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन सर्वे करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टर वर तरुणाने हा हल्ला केला....!! नागपूर- नुकतीच हिंगणघाट येथील जळीतकांड घटना ताजी असताना आणखी एका महिला डॉक्टर वर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता सावनेर तालुक्यातील पहलेपोर येथे घडली. आरोपी निलेश कनेरे (वय 22) रा. बाजारचौक सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवाशी असे त्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन सर्वे करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टर वर तरुणाने हा हल्ला केला. दरम्यान 3 नागपूर तर 2 सावनेर डॉक्टर हे पहलेपोर या गावात सर्वे करत होते. त्याच वेळी एका तरुणाने महिला डॉक्टर वर ऍसिड फेकले त्यात तीला गंभीर जखम झाली तर इतर सोफिया सोमन, शुक्रा जोशी, सुरेखा बडे, गवळी सोनेकर व सुकन्या कांबळे असे पाच महिला डॉक्टर वर ऍसिड उडाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्या तरुणाला पकडून चांगले हाणले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान परिसरात वातावरण चिघडले होते. आरोपीला अटक करून तात्काळ जखमींना नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......