WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीतील पुनम वासाडे इटलीतील चित्रकला स्पर्धेत तिसऱ्या स्थानी

ImageImage

वणीतील कणकवाडी परिसरा मधील ती रहिवासी आहे. अलीकडेच इटलीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत तिच्या चित्राला तिसऱ्या क्रमांकाच पारितोषिक मिळालं. इटलीच्या इंटरनॅशनल एक्स लिब्रिस कॉन्टेस्ट, लायब्ररी ऑफ बाडिओ लोमनागोमध्ये आयोजित इंटरनॅशनल प्रिंट मेकिंग स्पर्धेत न्यू यंग आर्टिस्ट कॅटेगरीतून तिने हे यश संपादन केले, पहिला पुरस्कार चीनच्या झेंग चँग याला, तर द्वितीय पुरस्कार पोलंडच्या डॉमनिक डोमानिका बोरवस्का याला जाहीर झाला आहे.

अगदी बालवयापासून पूनमला चित्राच वेड. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातून बीएप्रथम वर्षाला शिकत असतानाच तिने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील ज्ञानेश कला महाविद्यालयात कला शिक्षक पदविकेसाठी प्रवेश घेतला. नाटयवंत चित्रकार कलावंत असलेले सदानंद बोरकर हे या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्यांच्याच तालमीत प्राध्यपक अतुल कामडी, प्रा. श्वेता पोइनकर, लक्ष्मीकांत लेंझे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने चित्रकलेचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानं पूनम आता वणीत परतली आहे. आपल्या हातून उत्तम चित्रकार निर्माण व्हावेत, असे तिला वाटते आणि आपल्या यशाचे श्रेय ती आई - वडील व पती प्रज्योत वासाडे यांना देते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.