WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भरधाव दुचाकीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणात आरोपी संजय धुमाळ याला 6 वर्षे 9 महिने 10 दिवसाचा कारावास

Image

‌‌‌ प्रथमवर्ग न्यायालयाचा निर्णय

वणी शहर प्रतिनिधी:-

निलेश चौधरी

अब्दुल खलील अब्दुल रज्जाक (45) रा. रामपुरा वार्ड ,वणी यांच्या तक्रारीवरून ,दिनांक 10/11/19 रोजी दुपारी 4:30वाजताच्या दरम्यान ,त्यांची नातेवाईक महिला ही तिच्या दोन मुलांसह ,ईद सणानिमित्त ,वाघदरा येथील नातेवाईकांकडे जात असताना... रस्ता ओलांडतांना ,वणी कडून येणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम. एच. 34 एएल 1212 चालक संजय राजु धुमाळ(30) रा.गोकुळ नगर, याने वाहन निष्काळजीपणे चालवून , भरधाव दुचाकीच्या धडकेत, पायदळ जात असलेला मुलगा 3 वर्ष याला जोरदार धडक दिल्याने, मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागून तो जखमी झाल्याने ,त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले .त्यात मुलाची प्रकृती गंभीर असल्याने ,त्या दुचाकी चालकावर ,कलम 279,337भादवि सहकलम 134(A),134(B)सह अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याने . त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली .आणी चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान तो मुलगा दगावल्याने ,डेथ मेमो प्राप्त झाल्याने , गुन्ह्यात 304(अ) वाढ करण्यात आली .गुन्ह्यातील आरोपी याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसल्यामुळे ,आणि दुचाकी संदर्भातील कुठल्याही प्रकारचे कागदपत्र व वाहन विमा असल्याने व वाहन चालक यांने धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याने, हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले.व ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच. 34 एएल 1212 बनावट नंबर प्लेट लावलेले ,आरटीओच्या माहितीनंतर निष्पन्न झाले .त्यामुळे आरोपी संजय राजाराम धुमाळ (31) रा.गोकुळ नगर वनी याच्या विरुद्ध कलम 279,337,304 (अ ),468,471,417 भादवि सहकलम 134(A),134(B) ,3/181, 146/196,130(3)/177,184 मोवाका अन्वय पोहवा / विठ्ठल भुरेवार यांनी आरोपीविरुद्ध साक्षी पुरावे गोळा करून ,दोष पत्र दाखल केले असता मा. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय वणी यांनी आरोपी संजय राजाराम धुमाळ (31), रा.गोकुळ नगर वणी, यास गुन्ह्यात दोषी ठरवून.. 6वर्ष ,9महिने ,10दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली .या गुन्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नाईक , पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल भुरेवार यांनी तपास केला .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......