WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळकांचा अपमान सहन करणार नाही..... शिवसेना नेते राजू तुरांकर यांचा शासनाला इशारा....

Image

सागर मुने, वणी

नगर परिषद वणी एक हाती सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं चित्र दिसत आहे, याची दखल शिवसेना नेते राजू तुरांकर यांनी घेतली. शहरातील वाहतुकीस 15 वर्षा पूर्वी लोकमान्य टिळकांचा पुतळा अडथळा निर्माण होत असल्याने टिळकांच्या पुतळ्याला बाजूला ठेवण्यात आले आहे.

त्यांचं ठिकाणी नगर परिषद ने टिळकांचा पुतळा ज्या ठिकाणी होता तिथे पुन्हा एक मनोरा उभा केला आहे, त्यामुळे हा मनोरा वाहतुकीस अडथळा का ठरत नाही, असा प्रश्न शिवसेना नेते राजू तुरांकर यांनी वणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन पुन्हा लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्ववत त्याच ठिकाणी त्यांची स्थापना करावी अशी मागणी केली आहे.

वणी नगर परिषदवर एक हाती सत्ता असणाऱ्यांची व त्यांच्या हातचे बाहुले असणारे मुख्यधिकारी यांची दादागिरी खपवून घेणार नाही अस इशारा प्रशासनाला देण्यात आला. हे अवैद्य बांधकाम त्वरित पाडण्यात यावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा हद्दीत रस्ता आहे व कोणतीही परवानगी घेतली नाही त्यामुळे त्वरित कारवाई झाली नाही तर शिवसेना पद्धतीने आंदोलन करणार व त्याला जवाबदार, प्रशासन , शासन राहील हे लक्षत ठेवावे असा इशारा दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR