WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेवटच्या घटका पर्यन्त यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग पोचविण्याचा प्रयत्न ! प्रशांत माधमशेट्टीवार

ImageImage

वणी :दिनांक 26 जाने रविवार रोजी यवतमाळ अर्बन बँक शाखा वणी तर्फे वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार ह्याचे हस्ते तिरंगी झेंडयांचे ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर बँकेच्या सभागृहात भारत माता पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांत

माधमशेट्टीवार होते ,व्यासपीठावर बँकेच्या संचालिका वैदेही नायगावकर ,गजानन महाराज मंडळाचे अनिल मामा ढाले ,शाखा व्यवस्थापक गजानन ठोंबरे हे होते .

भारत मातेचे पूजन व तिरंगी झेंड्या ला सलामी आपण देतो ,अर्बन बँक बॅंकिंग व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आवर्जून पर्यन्त करते ,त्याचाच एक भाग म्हणून भारत माता पूजनाचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून घेत आहे .भारत माते बद्दल सर्वाचा आदर वाढवा हीच भावना त्या मागे आहे .बँक बँकिंग करतांना आधुनिक सोयी देण्याचा प्रयत्न करते त्याचा भाग म्हणून फास्टटॅग सेवा बँकेने सुरू केली आहे तसेच सभासद ग्राहकांचा आरोग्याचा विचार करून बँकेने रु600 वार्षिक भरून रु50000आरोग्य विमा सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे त्या करीता सभासद ग्राहकाने रु 600 भरणे आवश्यक आहे .शेवटच्या घटका पर्यन्त यवतमाळ अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकिंग सेवा पोचविण्याचा प्रयत्न असून दरमहा ठेवी वाढत असून कर्ज योग्य व गरजवंताला उपलब्ध करून दिले जात आहे असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशांत माधमशेट्टीवार ह्यानी केले ,अनिलमामा ढाले,प्रमोद सप्रे,रवी बेलूरकर ,प्रसाद नावलेकर ह्यांनी आपले विचार व्यक्त केले .

भारत माते करीता योगदान म्हणून कचरा कचरा पेटीत टाकायला हवा ह्या करीता पांढरकवडा येथीलयुवा फॉनडेशनचे प्रिंटेश बोरेले ह्यानी प्रसाद नावलेकर ह्यांनी दिलेल्या सादाला प्रतिसाद देतांना दिले कमरे एव्हढ्या उंचीच्या 100 कचरा पेट्या ते देणार आहे तसेच रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर हे सुद्धा मोठ्या संख्येत योगदान देणार असून विभागीय अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार हे महत्वाची भूमिका घेणार असून वणी शहर हे कचरा मुक्त करण्यासाठी वणीतील सर्व सामाजिक संस्थांची मदत घेऊन भव्य कार्य उभं करू असा मनोदय व्यक्त केला .

मान्यवरांचे हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर मान्यवरांचे स्वागत उपस्थित राम देशपांडे,संजय जिन्हावार,विजया पुसनाके ,अजानीकाका ह्याचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

फास्टटॉग सेवेचा शुभारंभ वणी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व त्या बाबतची सूत्रे शाखाव्यवस्थापक गजानन ठोबरे ह्यांचे कडे देण्यात आली .

संघाचे तृतीय वर्ष वयाचे64 व्या वर्षी पूर्ण करून आल्या बद्दल अंबर घरोटे ह्यांचा सत्कार वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार ह्यांनी केला .

कृष्णा पूरावार ह्यानी भारतमातेचे सुंदर गीत गायले .

कर्यक्रमाला अशोक ठावरी, विवेक कोकणे,गणेश धानोरकर,आकाश बुद्धेवार, सुभाष इंगोले,संतोष लांजेवार,प्रसाद चिंडाले, आबा सालकाडे,करण किंगरे ,विक्की नानवाणीसहअनेकव्यापारी ,डॉक्टर,अभियंता ,शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे प्राधिकृत अधिकारी प्रसाद नावलेकर ह्यांनी केले ,प्रास्ताविक वणी

विभागाचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार ह्यांनी केले ,आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक गजानन ठोंबरे ह्यांनी मानले .

बँकेचे कर्मचारी विजय सराफ, संजय राजूरकर ,दिलीप लोंढे,प्रमोद उरकुडे,जीवन चौधरी ,विलास पचारे ,रवी लोथे ,देविदास गेडाम,केतन लांभे सह अनेक कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......