WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहर भयमुक्त करणार..... ठाणेदार बाळासाहेब खाडे.....

Image

सुरज चाटे वणी :- वणी पोलिस स्टेशन व शांतता कमिटी यांचे संयुक्त विद्यमाने वसंत जिनिग सभागृहात दिनांक 10 सप्टें सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती

या सभेचे अध्यक्ष स्थानि पोलीस अधीक्षक एम राजकुमार हे होते प्रमुख अतिथी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे एसडीओ प्रकाश राऊत एसडीपीओ विजय लगारे मुख्याधिकारी संदीप बोरकर, डॉ आवारी, बीडीओ राजेश गायणार ठाणेदार बाळासाहेब खाडे, संग्राम ताठे, वाकडे साहेब उपस्थित होते या वेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचा सत्कार आमदार संजीवरेड्डी बोडकूलवार तारेंद्र बोर्डे व शांतता कमिटी सदस्य रोटरी व जेसीस तर्फे शाल व श्रीफल देऊन करण्यात आला, या प्रसंगी प्रस्ताविकपर विचार व्यक्तकरताना ठाणेदार खाडे म्हणाले की, वणी शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध राऊन कर्तव्यनिष्ठेने व जबाबदारीने संपूर्ण वणी शहरातील माताभगिनींना वणी भयमुक्त करून दाखवीन यासाठी मी कटिबद्ध राहील असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे तसेच शांतता कमिटीचे सदस्य राजाभाऊ पाथरडकर, महेंद्र लोढा, राजु उंबरकर, मंगल तेलंग, रजाक पठाण शालिनीताई रासेकर, राकेश खुराणा, रवी बेलूरकर, नारायण गोडे, यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गणपतीची परवानगी ऑन लाईन मिळेल मूर्ती ची स्थपणा रोडवर करू नये दहा दिवस मूर्तीची काळजी घ्यावी देखावे करत असताना कायदेशीर इलेक्ट्रिक सप्लाय घ्या कायद्याचा भंग होणार नाही दोन दिवस विसर्जन चालणार आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊं देऊं नये गणेश उत्सव दुर्गा उसत्व मोहरम यासारखे उसत्व सर्वधर्म समभावाने साजरे करण्यात यावे जेणेकरून शांतताप्रिय वणीची शांतता भंग होऊ नये येथील नागरिकांनी काळजी घ्यावी ध्वनी प्रदूषणाबद्दल कायदा असून वाद्यांच्या संदर्भात कायदा नाही, परंतु त्या वादय।चा आवाज हा 50 ते 55 डे शिबल च्यावर जाता कामा नये याची नोंद घ्यावी असे सुद्धा सभेत सांगितले यावेळी सभेचे संचालन रवी साल्फेकर यांनी केले तर आभार वाकडे साहेब यांनी मानले यशस्वीतेसाठी पोलीस विभाग व शांतता कमिटी ने परिश्रम घेतले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.