WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपाच्या घर घर चलो अभियानाला सुरुवात...

Image

जिल्हा अभियानाची सुरुवात वणी पासून झाली...

सागर मुने, वणी

नागरिकता संशोधन कायद्याची वास्तविकता सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील या अभियानाची सुरुवात वणी शहरातून करण्यात आली आहे. अशी माहिती या अभियानाचे जिल्हा प्रमुख आमदार डॉ.अशोक उईके यांनी वणी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे दिनकर पावडे, विजय पिदूरकर, राजू पडगीलवार पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते इत्यादी नेते उपस्थित होते.

नागरिकता संशोधन कायद्याच्या जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या अभियानाची पार्श्वभूमी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विशद केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी नागरिकता संशोधन कायद्याची देशाला आवश्यकता असल्याचे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यानंतर नागरिकता संशोधनाविषयी बोलतांना आ.उईके म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकत्व संशोधन कायद्याची अत्यंत आवश्यक होती. हा कायदा नवीन नसून 1955 साली कांग्रेस सरकारने आणलेल्या नागरिकता कायदा नागरिकता फक्त सुधारणा करण्यात आली आहे. या कायद्याविषयी जाणीवपूर्वक भ्रामक गैरसमज पसरवल्या जात आहेत. कायदे मंडळात पारित झालेला कायद्याचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण कायद्याचा सन्मान न करता हा कायदा देशातील कोणत्याही मुस्लिमाविरुद्ध नसतांना जाणीवपूर्वक अपप्रचार करून संभ्रम दूर करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आजपासून जनजागरण अभियानाची सुरुवात करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत प्रत्यक्ष अल्पसंख्खाक, दलित वस्तीत जाऊन जनसंपर्काद्वारे नागरिकत्व कायदा म्हणजे काय? हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातून येणाऱ्या पीडितासाठी आहे. देशातील कोणत्याही नागरिकांसाठी नाही. अशी वास्तविकता प्रत्यक्षपणे सांगितल्याने या कायद्याचे विरोधक व कांग्रेसच्या अपप्रचाराला या अभियानाने प्रतिबंध लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......