WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूऱ्यात वाघाचे हल्ले सुरूच, आणखी एकाचा वाघाने घेतला बळी

ImageImage

ग्रामवासी संतापले, लवकर वाघांचा बंदोबस्त करा..अन्यथा...

प्रतिनिधी

राजुरा- राजुरा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाघ हल्ले सत्र सुरु असताना आणखी एका तरुणाचा वाघाने बळी घेतला. संतोष खामनकर (वय४४) रा.धानोरा असे मृतकाचे नाव आहे. हि घटना सकाळी गुरे चरायला घेऊन गेल्यानंतर जंगलात घडली.

सविस्तर माहिती अशी कि, खामनकर हे आज सकाळी जंगलात गुरे चरायला घेऊन गेले होते. गुरे चारत असताना

अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार केले. या घटनेने धानोरा परिसरात शोककळा पसरली आहे.

मागील कित्येक दिवसापासून ऐकामागुन एक मनुष्याचा बळी वाघ घेत आहे आणि वन विभाग सुस्त झोपले आहे. वारंवार सांगून ही वन विभाग आणि प्रशासन वाघांची बंदोबस्त करत नसून मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे असे संतापलेल्या नागरिकांनी म्हटले. आणखी किती बळी हे वन्यप्राणी घेतील का्य? सांगता येत नाही. या परिसरात ४/५ प्रौढ वाघ असल्याची चर्चा नगरिकात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे धानोरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, असेही चर्चा आहे की, प्रशिक्षित कर्मचारी वर्गाचा अभाव असल्याने यावर नियंत्रण आणने अवघड असल्याचे बोलल्या जाते. पण मात्र, आता नागरिक संतापली आहे. जनतेचा उद्रेक उठण्यापूर्वी वन विभागाने कठोर पावले उचलावी अन्यथा स्थानिक जनता कायदा हातात घेतील. अशी संतप्त भावना व्यक्त ग्रामवासीयांनी केली आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......