WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पो. स्टे. मारेगाव वर्धापण दिन सप्ताह

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

मारेगाव:आज दि. 02,01,2020 रोजी पोलीस वर्धापण दिन व सप्ताह दि. 02,01,2020 ते 08,01,2020 अनुषंगाने पो.स्टे. मारेगाव परिसरातील स्व. चिंधुजी पूरके प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मारेगाव येथे वर्ग पहिले ते दहावी पर्यंत शिकत असलेले 347 विद्यार्थी व विध्यार्थीनी यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे व सायबर क्राईम ऍक्ट बाबत पोलीस निरीक्षक श्री जगदीश मंडलवार (ठाणेदार पो. स्टे मारेगाव) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व डॉ. सपना केलोडे यांनी गुड टच व बॅड टच (चांगला स्पर्श वाईट स्पर्श) बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये राहुल ओईंबे (गोपनीय शाखा) पो. स्टे मारेगाव तसेच श्री. चहानकर (मुख्याध्यापक), श्री. लिंगावार (शिक्षक), कु. रिना रॉय शिक्षिका इतर हजर होते.

तसेच रेजिंग डे निमित्त आज दिनांक. 02,01,2020 रोजी पो. स्टे मारेगाव ला अपक्र 320/19 क. 279, 304 (अ) भा.द.वि मधील जप्त मुद्देमाल ट्रॅक्टर क्र. MH29/AC 1335 व ट्राली क्र. MH29 9942 श्री जयंत ऋषिकेश मत्ते पिंपळगाव यांच्या ताब्यात दिला. तसेच अप न. 3/6/19 क. 363, 376(1) भादवि मधील मुद्देमाल हिरो होंडा स्प्लेंडर MH29 BA 8827 श्री. रवी हरबाजी कोल्हे रा मारेगाव यांना ताब्यात देण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.