WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पांढरकवडा येथे ग्राहक दिनाने घेतला मोकळा श्वास ! ग्राहक प्रहार संघटनेने केला तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांचे अभिनंदन !

Image

24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन चार भिंतीच्या आत न घेता शाळा महाविध्यालयात येण्यात यावा .ग्राहकाला त्याचे हक्क ह्याची जाणीव व्हावी करीता ग्राहक प्रहार संघटना दर वर्षी जिल्हाधिकारी ,तहसीलदार व प्रसार माध्यमातून ग्राहक दिन चार भिंतीच्या आत न घेता त्याला सार्वजनिक करा असा टाहो फोडत असते पण ह्या वर्षी पांढरकवडा येथील तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांनी जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रम कुठे घायचा ह्या बाबत चर्चा केली व पारवेकर महाविध्यालयात कार्यक्रम घेण्याचे निश्चित करून उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतला .शेकडो लोकांपर्यंत ग्राहक दिनाचे महत्व पोचले !ग्राहक दिनाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला !

करीता ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांचे ग्राहक प्रहारचे जिल्हा कार्यध्यक्ष दामोधर बाजोरीया ह्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .ह्या प्रसंगी ग्राहक प्रहारचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे ,कोषाध्यक्ष सुनील धवने,डॉ किरण मायी,यशवंत काळे,पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे, राजेंद्र उपलेंचवार, मनोज गेडाम,सचिन मेश्राम, सचिन काकडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR