WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माणकी ग्राम पंचायतचा आणखी एक मनमानी कारभार चव्हाट्यावर

Image

प्रतिनिधी सागर मुने, वणी

ग्रामसभेला कर्मचारी,पदाधिकारी उपस्थिन नसल्याने ग्रामवासीयांत असंतोष

तालुक्यातील माणकी ग्राम पंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे.या ग्राम पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असुन त्या गैरप्रकाराची चौकशी सुरु आहे.या ग्राम पंचायत विरोधात मोठ्याप्रमाणात तक्रारी दाखल होवुन सुद्धा मुजोर कर्मचारी,पदाधिकारी यांचा मनमाणी कारभार अजुनही सुरुच आहे.

आज दि.25 डिसेंबरला सकाळी 10 वाजता येथिल ग्राम पंचायत कार्यालय मध्ये ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेसाठी सकाळी 9 वाजतापासुनच गावातील ग्रामवासी उपस्थित होते.परंतु 10:15 वाजेपर्यंत एकही कर्मचारी,पदाधिकारी उपस्थित झाले नव्हते.या ग्रा.पं.चे शिपाई प्रेमदास राजगडकर यांच्याकडुन या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी सकाळी 8 वाजता ग्रां.पं.चे कार्यालय उघडले व अधिकारी,पदाधिकारी यांची वाट बघत असल्याची माहीती दिली.त्यांनी असेही सांगीतले की.ग्रा.पं.ला उपस्थि होणार्या ग्रामस्थांच्या सह्यांचे रजिस्टर सुद्धा कपाट मध्येच असल्याचे सांगीतले.परिणामी 10:15 वाजेपर्यंत सदर पदाधिकारी व सचिवाची वाट पाहुन ग्रामस्थ आप आपल्या कामाला निघुन गेले.तत्पुर्वि या प्रकाराची तक्रार देणार असल्याचे ग्रामस्थांमधुन बोलल्या जात होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.