WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पळसोडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

Image

सागर मुने,वणी

विदयार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पळसोडा येथे दि.23 व 24 डिसेंबरला तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या मॉडेलला सुद्धा संधी देण्यात आली आहे.

या विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन दि.23 डिसेंबरला सकाळी 11 वाजता होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे करणार असून अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते ह्या राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, बंडुभाऊ चांदेकर, संघदीप भगत, परशराम पेंदोर पंचायत समिती सदस्य महेश उरांडे, संजय निखाडे, टिकाराम खाडे, शिलाताई कोडापे, चंद्रज्योती शेंडे, वर्षाताई पोतराजे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, समाज कल्याण विभागाचे धर्माधिकारी, गटविकास अधिकारी राजेश गायनर उपस्थित राहणार आहेत.

या विज्ञान प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. 24 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषद वणी शाखेचे अध्यक्ष प्रा.महादेव खाडे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लिशाताई विधाते, संजय पिंपळशेंडे, बंडूभाऊ चांदेकर, संघदीप भगत, मंगलाताई पावडे, परसराम पेंदोर, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे उपस्थित राहणार आहेत.

या विज्ञान प्रदर्शनीत वणी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, तालुका समन्वयक लक्ष्मण इड्डे, आयोजक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी दांडेकर यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.