WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतात पाच वर्षाच्या चिमुकलीवर तोंडात कापड कोंबून बलात्कार, नागपूरसह कळमेश्वर बंद

Image

तुरीच्या शेंगा देतो सांगून बलात्कार करून नराधमाने दगडाने ठेचून ठार केले...!!

नागपूर- देशभर डॉ. रेड्डीच्या अमानुष घटनेने जनसमाज हादरला होता. त्यानंतर जामोद खेड अशा ठिकाणीही त्याची पुरावृत्ती झाली. आता तेच उपराजधानी कळमेश्वर येथे दिसून आली आहे. चक्क तोंडात कापड कोंबून पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आणि दगडाने ठेचून ठार केले. या घटनेने नागपुरात संतापाची लाट उसळली असून कळमेश्वरसह नागपूर बंद पुकारण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी संजय देवराव पुरी रा. सावंगी मोहगाव चा असून हल्ली लिंगा येथे अटक करण्यात आली.

सविस्तर असे की संजय गेल्या अनेक महिन्यापासून त्या मुलीच्या पत्यावर होता. आरोपीने तिला रोज काही ना देऊन संबंध जोडला आणि ओळख केली. तुरीच्या शेंगा देतो अशी बतावणी केली. शुक्रवारी ती शाळेतून घरी आली व आजोबांकडे जातो म्हणून ती निघाली. पण मुलगी तिकडे पोहोचलीच नाही. घरच्यांना शंका आली शोधाशोध सुरु झाली. ती कुठेही आढळली नाही. शेवटी कळमेश्वर पोलीस स्टेशनला तिच्या कुटुंबियानी तक्रार दाखल केली.

दिवस उजळला आणि नागपुरातील संजय भारती यांच्या शेतात 11 वाजताच्या सुमारास विचित्र अवस्थेत मुलगी नागरिकांना आढळून आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. एवढेच नाही तर दगडाने तीला ठेचून ठार मारण्यात आले होते. या घटनेची वार्ता परिसरात पोहचतात एकच खळबळ उडाली असून संतापात नागरिकांनी आज कळमेश्वर बंद पुकारला. सदर आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा नराधम शेतातील रोजमजुरीचे काम करतो. दारू पिऊन राहतो असा त्याचा नित्याक्रम आहे अशी चर्चा आहे. नराधमावर खून बलात्कार आणि ऍट्रॉसिटी गुन्हा नोंदवण्यात आला. नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून नराधमाला फाशी द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......