WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळे वाटप

Image

प्रतिनिधी देव येवले - संभाजी ब्रिगेड झरी तालुकाच्या वतीने शनिवाराला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली. गेल्या २५ वर्षांमध्ये संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतीक व शैक्षणीक कार्य केलेले आहे. संभाजी ब्रिगेडने आपल्या 100% समाजकारण व 100% राजकारण या शैलीमुळे प्रसिध्दी आणि लोकप्रियता अतिशय वेगाने प्राप्त केली आहे. हि महाराष्ट्रातील एक वैचारिक तरुणाची संघटना आहे. ब्रिगेडमध्ये हजारो तरुणाची खूप मोठी टीम आहे जे त्यांच्या संघटनेसाठी कोणतेही कार्य अगदी प्रामाणिकपणे करतात. 25 वर्षाच्या सामाजिक कार्यानंतर संभाजी ब्रिगेडने 30 नोव्हेंबर 2016 ला राजकारणात पदार्पण केले त्याचेच औचित्त साधून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तर वर्धापन दिनानिमित्त सर्वस्तरातून शुभेच्छा हि देण्यात आल्या. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष देव येवले, वीर भगत सिंग विद्यार्थी परिषद तालुकाअध्यक्ष समीर लेनगुरे, नितेश ठाकरे, डॉ. कारमोरे साहेब, अधिकारी किनाके सर, संदीप आसुटकार विनोद पिंपळकर, अतुल काळे, श्रीकांत ठेगने, महेश क्षीरसागर, रमेश उरवते, प्रकाश नैताम, गिरीश गिरडकर, विठ्ठल राजूरकर, गणेश उईके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले