WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ह.भ.प रमेशपंत गोफणे यांची वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती,,,

Image

वणी

सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वणी चे विश्वस्त व सहसचिव ह.भ.प रमेशपंत शंकरराव गोफणे यांची दिनांक १६ नोव्हेंबर ला नंदेश्वर देवस्थान,वणी येतील कार्यक्रमात वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

वारकरी साहित्य परिषद सम्पूर्ण महाराष्ट्रात मध्ये व्यापलेले आहे व या परिषदे अंतर्गत कीर्तन,प्रवचन, यांच्या माध्यमातून जनजागृती, व्यसनमुक्ती,व लोककल्याणाचे कार्य केले जाते दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ ला नंदेश्वर देवस्थान,वणी येतील कार्यक्रमात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भागवत भूषण ह.भ.प गुलाबराव महाराज राऊत हे किर्तनासाठी आलेले असताना त्यांनी कार्यक्रमात ह.भ.प रमेशपंत गोफणे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली

या कार्यक्रमात मृदंगाचार्य ह.भ.प सुरेशमहाराज लासेकर, ह.भ.प श्याममहाराज ह.भ.प दामोदरपंत आवारी महाराज ह.भ.प आसुटकर गुरुजी, ह.भ.प पुरुषोत्तम महाराज ह.भ.प प्रकाश महाराज येसेकर, ह.भ.प ठेंगणे महाराज, भागवतकार मनू महाराज तुंगनायक पाहुणे म्हणून यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर, व परिसरातील भक्तगण उपस्थित होते त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थांच्या अध्यक्षा श्रीमती गायबाई देरकर,व सचिव संजय नीलकंठराव देरकर यांनी अभिनंदन केले,त्यांच्या नियुक्ती ने परिसरातील भक्तगण व वारकरी मंडळीत नवचैतन्य निर्माण झाल्याची माहिती दिली

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले