WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार.

Image

*प्रतिनिधी:-संघर्ष भगत यवतमाळ* (बिबी येथील घटना/आरोपी अटकेत,बाजारपेठ बंद) चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बिबी गाव येथे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे चार, वाजताच्या सुमारास एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.सदर घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून सर्वस्तरातून घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.हकीम हुसेन पठाण यांच्या फिर्यादी वरून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक करून ३७६,३४२,३२३ आयपीसी कलम ८,१० प्रमाणे पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा तपास एपीआय देवकर मॅडम करीत असून आरोपी मुलगा हा रामनगर बिबी येथील रहिवासी असून पीडित मुलीच्या घरशेजारी राहत असल्याची माहिती मिळात आहे.पिडीत मुलीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तर आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सदर घटनेमुळे बिबी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले