WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजी नगरसेवक व प्रसिद्ध वकील इकबाल खलिल यांचे निधन...

Image

सुरज चाटे वणी :-

सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी, दिलाचा सच्चा माणूस म्हणून सर्वत्र परिचित....

वणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध विधिज्ञ म्हणून ख्याती असलेले वणीच्या राजकारणात असो की समाजकारणात नेहमी अग्रेसर भूमिका बजावणारे ऍड इकबाल अ खलिल यांचे आज दिनांक 27 ला पहाटेच्या दरम्यान निधन झाले.

वणी, मारेगाव, झरीजामनी, केलापुर, पांढरकवडा आदी कोर्टात नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे गोरगरिबांच्या न्यायासाठी हक्काने त्यांची बाजू न्यायालयात मांडून त्यांना न्याय मिळवून देणारा चेहरा आज जगाच्या पडद्या आड गेला असून माळीपूरा येथील रहिवासी असलेले अपक्ष माजी नगरसेवक इकबाल अ खलिल यांनी आज दिनांक 27 ला पहाटेला अखेरचा श्वास घेतला, कित्येक तरुणांना मायेचा आसरा देणारे व त्यांच्या हाथाला काम देऊन त्यांना अत्योछ स्थानावर पोहोचविणारे, नेहमी सुख दुःखात मोकळ्या मनाने सोबत उभे राहणारे म्हणून त्यांची ख्याती होती, आता असा सेवाभावी चेहरा आपल्यातून निघून गेल्याने परिसरात एकच खळबळ झाली आहे, दरम्यान त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या यामुळं सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले