WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोठ्या भावानेच लहान भावाची कुराडीने केली हत्या

Image

सोनूपोड येथील थराराक...भाई का दुश्मन भाई

प्रतिनिधी- सचिन मेश्राम

मारेगाव- तालुक्यातील सोनुपोड येथील आरोपी काशिनाथ गंगाराम आत्राम यांनी दिली हत्याची कबुली. ता.प्र. मारेगाव तालुक्यातील बोटोनी पासून 3 की.मी. अंतरावर असलेल्या सराटी सोनूपोड येथील शेतीच्या ठेक्याचे चार हजार रूपये दिले नाही या क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा खुन केल्याची क्लेशदायक आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना घडली.

तुकाराम गंगाराम आत्राम (वय 50) रा. सोनूपोड सराटी असे मृतकाचे नाव असून या खून प्रकरणी काशिनाथ आत्राम याला मारेगाव पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी मृतकाची पत्नी शेवंताबाई तुकाराम आत्राम यांच्या बयानानुसार मृतक तुकाराम आत्राम हा रात्री दरम्यान 9 वाजताच्या दरम्यान शेतामध्ये जातो असे घरी सांगून घरून निघून गेला. रात्रभर पती घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधा शोध सुरु केली. तुकाराम कुठेच आढळला नाही. शेवटी शेताकडे शोध घेण्यासाठी गेले असता मृतक स्वताच्या शेताजवळ मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती सदर मृतकच्या पत्नीने मोठ्या मुलाला सांगितले व सर्व आत्राम कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी मृतकच्या डोक्याखाली रक्त सांडलेले होते तसेच गळ्यावर विचित्र जखमा घटनास्थळी आढळून आल्या. याबाबत आत्राम कुटुंबियांनी लगेच मारेगाव पोलिस ठाणे गाठून संशयित विरूद्ध तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिल कुमार नायक तसेच मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास केला असता या प्रकरणी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली मारेगाव पोलीस करीत आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले