WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुतार समाज यांच्या वतीने प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस साजरा,,,,

Image

* अपंग मुलांना बुक,पेन व फळ वाटप,

* महासंघ कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार यांचा सत्कार,,,

वणी  मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, युवा मंच व महिला मंच यांच्या वतीने सुतार समाजाचे आराध्य दैवत व शास्त्रांचे देव प्रभू विश्वकर्मा यांचा दिनांक १७ सप्टेंबर ला पूजन दिवस व तिथी नुसार जयंती साजरी यात अपंग मुलांना बुक,पेन,व फळाचें वाटप करण्यात आले तसेच नवनिर्वाचित महासंघ कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष व सल्लागार यांचा सत्कार करण्यात आला 

    १७ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र भारत देशात प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस साजरा केला जातो,कारखाने,डब्ल्यू,सी, एल ,तसेच ज्या ज्या ठिकाणी मशनिरीज, व शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कामगार कार्य करत असेल त्या ठिकाणावर हा दिवस विधीवत प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्ती ची स्थापना करून पूजा,अर्चना केली जाते त्यानंतर दोन दिवसांनी हर्ष,उल्हासाने व वाजतगाजत मूर्तीचे विसर्जन केले जाते अशा प्रकारे हा दिवस साजरा केला जात असे 

मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था,युवा मंच व महिला मंच यांच्या वतीने यावर्षाला अपंग पुनर्वसन संस्था वणी येतील अपंग मुलांना बुक,पेन व फळांचे वाटप करण्यात आले तसेच महासंघ निवडणूक २०१९ घेण्यात आली होती त्या वणी विभाग सदस्य,महिला राखीव यांच्या निवडणुकीत अमन अशोकराव बुरडकर व सौ आरती गणेश वांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती तसेच याची महासंघ कार्यकारिनित कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष व सल्लागार म्हणून सौ, मंगलाताई पद्माकरजी झिलपे  स्थान देण्यात आले त्यानिमित्त वणी सुतार समाज कार्यकारिणी च्या वतीने सत्कार करण्यात आला  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, दौलतराव झिलपे,प्रमुख पाहुणे माजी सल्लागार अशोकराव बुरडकर,महिला मंच अध्यक्षा रत्नताई अंड्रस्कर युवा मंच अध्यक्ष महेश राखुंडे व सत्कारमूर्ती अमन अशोकराव बुरडकर, सौ, आरतीताई गणेश वांढरे व सौ मंगलाताई पद्माकरजी झिलपे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नवघरे व आभार प्रदर्शन हर्षल घोंगे यांनी केले कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.