WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठविला पुरग्रस्तासाठी मदतनिधी ......

Image

वणी पं.स.अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 49 शाळा मधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा,सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिव्रुष्टीमुळे आलेल्या भीषण महापुराची भीषणता विद्यार्थ्यांना सांगुन यात ऊध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी व नागरिकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनास प्रचंड प्रतिसाद मिळून 49 शाळांमधील विद्यार्थ्यांनी 87897 रुपये गोळा करून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला. जिल्हा परिषदेच्या या शाळामधील विद्यार्थ्यांना पुरग्रस्तांची माहिती देऊन त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करण्याचे आवाहन केल्या नंतर विविध शाळा मधील विद्यार्थीच्या संवेदना जागरूक होऊन मदतीचा हात देण्यासाठी विद्यार्थी कामाला लागले. यासाठी विविध शाळा मधील विद्यार्थ्यांनी गावात मदत रँली काढुन, काही विद्यार्थ्यांनी खाऊचे पैशातुन तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या बचत बँकेतील रक्कम मदत निधी साठी जमा केले. यात वणी पं.स.अंतर्गत एकूण 49 शाळा मधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 87,897 रुपये निधी गोळा करुन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संवेदना जागरुक करुन महापुरात ऊध्वस्त झालेल्या विद्यार्थी व नागरिकांना मदतीचा हात पुढे करुन संकट समयी आम्हीही दुस-याच्या पाठीशी आहोत हे सिद्ध केले याबाबत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच संबंधित विद्यार्थ्यांना मदत निधी गोळा करण्यासाठी तालुका समन्वक म्हणून प्र.विस्तार अधिकारी लक्ष्मण इदे व गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.