WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आँटो दुचाकीचा अपघात दोन ठार सहा गभिर जखमी मारेगांव येथील घटना

Image

प्रतिनिधी. सचीन मेश्राम .मारेगाव मारेगावःमारेगाव पासून एक किलो मिटर अंतरावर आँटो व दुचाकीचा अपघात घडलाची घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली आँटो. क्रमांक MH.29M.5284 हा बोटोणी वरुन मारेगांव कडे येत असताना दुचाकी क्र. MH29k3428 मारेगांव वरून बोटोणी कडे जात असताना विनायक कोटेक्से जवळ मोकाट गाय आडवी आल्याने आँटो चालकाचे आँटोवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वर जागीच ठार झाल्याची घटना घडली मृतकामध्ये तुळसीराम भिमा टेकाम (४५) रा. आवळगाव, संतोष नारायण मडावी (३८) आवळगाव, तर जखमीमध्ये अॅटोचालक अतुल रामदास मेश्राम (३९) बोटोणी, मारोती शिंदे (४०) बोटोणी, सुनिल भिमा तोटे (३०) बोटोणी, नीळकंठ टेकाम (३०) शिवनाळा, सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), बोटोणी, सुनिल बबन वखनोर (३०) बोटोणी यांचा समावेश आहे. घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते त्यांनी लगेच सरका-यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्नालयात आणले. तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले