WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनाथ, निराधार, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांची इतकी मोठी संख्या पाहून मला खूप दुःख झाले..... डॉक्टर विकास आमटे

Image

सागर मुने, वणी

वणी नगर सेवा समिती तर्फे अनाथ, गोर गरीब, शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास बाबा आमटे यांचे हस्ते 353 विद्यार्थ्यांना देण्यात आले.

उदघाटक विकास आमटे म्हणाले की इतकी मोठी संख्या पाहून माझ्या मनाला वेदना होत आहे. मी जे कार्य करतो त्यापेक्षा ही चांगलं कार्य नगर सेवा समिती करत आहे. गोर गरीब, अनाथ, शेतकरी आत्महत्या ग्रस्त मुलांसाठी कार्यकरून खूप मोठं काम होत आहे. अशा कार्यमध्ये माझी काही मदत लागत असेल तर मी नक्की मदत करील असे मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार, प्रमुख पाहुणे नरेंद्र नगरवाला, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडिया, सुनील कातकडे, पोलीस निरीक्षक वैभव जाधव उपस्थित होते. डॉक्टर विकास आमटे यांचा समिती तर्फे सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक समितीचे संस्थापक दिलीप कोरपेनवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेशजी बोबडे, गुलाबराव खुसपुरे, नारायण गोडे , अरुण कावडकर, कमलाकर चुंबळे, सागर मुने, नम्रता कोरपेनवार, सागर जाधव, रवी जुवारे,हितेश गोडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित, शिक्षक वर्ग ,माता पालकांची खुप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.स्नेहलता चुंबळे तर आभार सुभाष आडे यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले