WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पु.ल. देशपांडे एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रा. हेमंत चौधरींनी पटकावीला प्रथम क्रमांक...

ImageImage

पु.ल. देशपांडे एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रा. हेमंत चौधरींनी पटकावीला प्रथम क्रमांक... वणीच्या कलावंतांची मुंबईत भरारी....

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने पु ल देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात काही प्रमुख केंद्रावर घेण्यात आली. ही स्पर्धा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे संपन्न झाली. यात यवतमाळ च्या केंद्रावर वणीचे प्रा. हेमंत चौधरी यांना प्रथम पारितोषिक विजेता घोषित करण्यात आले.

परिसरातील विनोदी हास्य व नाट्य कलावंत प्रा. हेमंत चौधरी यांनी यवतमाळ येथे झालेल्या पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य त्यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री स्पर्धेत यवतमाळ केन्द्रावर एकपात्री प्रयोग सादर केला. त्यात त्यांनी कोकणी व पु.ल. देशपांडे निर्मिती अंतु बरवा हे पात्र हुबेहूब सादर करून आठवण करून दिली व त्यांच्या अभिनय सादर करून रसिक व परीक्षकांना साक्षात पु.ल. देशपांडे चे दर्शन दिल्याने त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना प्रमाणपत्र, मोमेटो व 20,000 रुपयांची धनराशी बक्षीस स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर त्यांना मुंबई येथे हास्य विनोदी कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. वणीचा कलावंत आता सोनी मराठी tv मध्ये आपली कला अख्या महाराष्ट्रात दाखवणार आहे.

वणी सारख्या छोट्या शहरात राहून विदर्भातील ठिकाणी ठिकाणी हास्य कला दाखवली तसेच राज्यनाट्य स्पर्धेत अभिनय करतात. व कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत सुध्दा पारितोषिक प्राप्त केले आहे.

यवतमाळ येथे झालेल्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांना मागे टाकून वणी शहराचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या या यशात त्यांचे गुरु वणीचे जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के व नाट्यचळवळीत अग्रगण्य असलेले त्यांचे मित्र सागर मुने यांचे योगदान आहे असे मत व्यक्त केले. हे यश संपादन केल्या बद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले