WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागतिक आदिवासी दिन महोत्सव

Image

अमोल कुमरे :- आज देशभर जागतिक आदिवासी दिवस मोठ्या हर्षाने साजरा करण्यात आला. *9 ऑगस्ट* हा जागतिक दिवस यूनोने घोषीत केला आहे. तो आज आदिवासी बांधव मोठ्या आनंदाने गावो-गावी साजरा करतात. वणी येथील भिमालपेन श्रद्धास्थान (शासकिय मैदानवणी) येथे सगा बांधव एकत्रित येतात व भिमालपेन दर्शन घेऊन हा दिवस पारंपारिक पध्दतीने, अफाट संख्येने साजरा करतात. पारंपारिक पध्दतीने हा महोत्सव बघायला बघ्याची फार गर्दी असते. त्याच सोबत सामाजिक दायित्व जाणून एक विशेष रेला या दिनी असतो ते या महोत्सवाच नाविन्य असतं.

मा, स्वपनिलजी धुर्वे युवा विद्यार्थी नेतृत्व यांच्या सहभागाने या वर्षी महोत्सवाची सुरूवात झाली. मोठ्या संख्येने आदिवासी बांधवानी या महोत्सवात रक्तदान शिबीर राबवून सामाजिक महान कार्य केले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहूणे व उपस्थिती मा. संजयभाऊ देरकर, मा. डॉ महेन्द्रजी, लोढा मा. गित घोष आणि इतर सामाजिक प्रमुख मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा भव्य दिव्य बाईक रॅली काढून शांततेने सामाजिक ऐक्याचा संदेश दाखवून दिला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.