WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत या वर्षी 300 मुली दत्तक

Image

वणी:- सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत सन 2002 पासून शाळेतील आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना समाज सहभागातून शैक्षणिक दृष्टीने दत्तक घेऊन त्यांना वर्षभर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते.

या वर्षी दि.10 ऑगस्टला सकाळी 10 वाजता येथील एस.बी. हॉल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात 300 मुलींना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे राहणार आहेत. या साहित्याचे वाटप निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांचा हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तिवसा भातकुलीचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तहसीलदार श्याम धनमणे, ठाणेदार वैभव जाधव, वणी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले