WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ए.सी.सी कन्व्हर्ट पट्टा बंद करा....मनसेची मागणी... उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर ...

Image

सुरज चाटे वणी :- ए.सी.सी. सिमेंट कंपनीचा कच्चा माल वाहून नेण्यासाठी शिंदोला विभागातून जात असलेला कन्व्हर्ट पट्ट्याने परिसरातील गावांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. याच विषयाला घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिंदोला ते सिमेंट नगर ए.सी.सी कन्व्हर्ट पट्टा बंद करण्यात यावा अशी मागणी केली. आपल्या विभागा अंतर्गत कंपनीला सक्तीचे आदेश देऊन येत्या दिवसात हा पट्टा करावा. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहितार्थ उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी मनसेचे आजिद शेख,गजानन ठाकरे,वैभव पीदुकार, राहुल कुटंलवार, निखिल पीदुरकार, महेश कुचनकार, राकेश लांडगे,गणपत झाडे, उमेश जीवतोडे, रवी लांडगे आदी पदाधिकारी व या विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...