WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघाच्या तावडीतून कुत्र्याने वाचविला मालकाचा जीव.....

Image

शक्ती पेक्षा युक्ती महान....

सुरज चाटे वणी :- कित्येकदा आपण चित्रपटाच्या दृश्यात वेगवेगळे सिन पहावयास मिडते मात्र प्रत्यक्षात जर असे घडले तर त्याला नशीबच समजावे असाच चित्तथरारक प्रकार झरी जामनी तालुक्यातील दाभाडी वन परिक्षेत्रात निदर्शनास आला असून चक्क घरच्या राखनकर्त्या कुत्र्याने वाघाच्या तावडीतून आपल्या मालकाचा जीव वाचविला असून शक्ती पेक्षा युक्ती महान असल्याचे उत्कृष्ट उदाहरण या घटनेतून स्पष्ट होत आहे व सदर कुत्र्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

झरीजामणी तालुक्यातील वनविभागाच्या दाभाडी वन परिक्षेत्रातील दिनांक 7 मे रोजी पांढरवाणी येथिल दादाराव दडांजे हा 35 वर्षीय वनकामगार जंगलात काम करण्यासाठी गेला असता, दादाराव हा नेहमीप्रमाणे जंगलात गेला होता. तेथे गावातील एक इसम सुध्दा जंगलात होता. तितक्यात गावातील व्यक्तीला वाघ दळी मारून शिकारीच्या शोधात लपून असल्याचे दिसले. त्याने दादारावला हाक मारली. दादाराव काम करीत असतांना वाघाचा शोध घेण्यासाठी निघाला होता. त्याच्या सोबत त्याचा कुत्रा सुध्दा होता. दोघेही जवळ येताच अचानक वाघाने दादारावच्या अंगावर वार केला त्यात दादाराव घाबरला परंतू लगेच सावरत त्याने प्रतिकार करायला सुरूवात केली. या झटपटीत वाघाची मान दादारावच्या हातात सापडली. त्याने वाघाची मान घट्ट पकडून ठेवली. वाघाची झटापट चालूच होती. दोघांचे कुस्तीयुध्द चांगलेच रंगले होते. सोबत असलेला कुत्रा भूंकत होता. तितक्यात वाघाने डाव साधला. आणि दादारावला झटका देवून खाली लोळवले. दादाराव खाली पडताच त्याचा कुत्रा आक्रमक झाला. आता आपला मालक वाघाच्या भक्षस्थानी गेला याची जाणिव त्याला होताच. कुत्र्याने वाघावर झडप घेत त्याला खाली लोळविले. यात दादाराव चांगलाच जखमी झााला होता. पाठीच्या उजव्या बाजूला मोठमोठे खोलवर घाव होते. इकडे वाघाचे व दादारावच्या कुृत्र्याचे युध्द रंगले होते. परंतू मालकावर हल्ला केल्याने वाघापेक्षा कुत्रा आक्रमक पवित्र्यात होता. कसाबसा सावरून दादाराव उठला कुत्रा वाघाशी झुंज देत होता. त्याने वाघाला पलटी मारून चांगलेच लोळविले होते. जसा दादाराव उठला कुत्रा अधिक आक्रमक झाला आणि मालकावर हल्ला करणा-या वाघाला पाळायला लावीत चलेजाव चा इशारा देत भुंकने सुरू केले. हा थरार वाघाच्या हल्ल्यात अपंगत्व आलेल्या दादाराव दडांजे यांनी कथन केला आहे. सद्यस्थितीत दादारावची पत्नी कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. दोन लहान मुले शिक्षण घेत आहे. एकीकडे घर चालविणारे चाक नादुरूस्त असल्याने दादारावचे कुटूंब मरणयातना भोगत आहे.

माणसांसाठी कितीही केले तरी तो विसरून जातो. जान जाये पर वाचन ना जाये अशी या कुत्र्याची कामगिरी असून यातुन मालकप्रति कुत्रा किती जीवत असतो हे या घटनेतून स्पष्ट होते त्यातच कुत्रा सुद्धा जखमी झाला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.