WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत योग दिन साजरा

Image

सुरज चाटे वणी :- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने वणीत विविध ठिकाणी योग साधनेचे वर्ग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला. वणी नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेच्या प्रांगणात नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शिक्षक वृंदासाठी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा योग वर्ग योग शिक्षक संजय आस्कर यांनी घेऊन विविध प्राणायाम घेऊन शास्त्रशुद्ध योग करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. एक तास पर्यंत चाललेल्या या योग वर्गात नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपमुख्याधिकारी कृष्णा देवरे, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होते. भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग सेवा समिती द्वारे येथील एस.बी. लाँन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील गणमान्य व्यक्ती, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. पहाटे 5*30 ते 7 या वेळात पार पडलेला हा योग वर्गाचे मुख्य संयोजक प्रा.महादेव खाडे, सहसंयोजक गुलाबराव खुसपुरे, योग शिक्षक लक्ष्मण इड्डे, रमेश बोबडे यांनी हा वर्ग घेतला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...