WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरपना - वणी - नागपूर बससेवा सुरू करा

Image

प्रवाश्यांची गैरसोय ; राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

वणी - कोरपना येथून वणी मार्गे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासाठी एकही थेट बस सेवा नसल्याने प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे अनेकदा लक्ष वेधून ही याकडे दुर्लक्ष होते आहे. कोरपना येथून थेट बस सेवा सुरू केल्यास कोरपना, कुरई, शिरपूर, सिंदोला ,वणी, वरोरा परिसरातील प्रवाश्यांना नागपूर जाणे - येणे सोयीचे होईल. वणी मार्ग हा नागपूर प्रवासासाठी अत्यंत कमी अंतराचा व आर्थिक दृष्ट्या सुलभ असल्याने प्रवाशी याच मार्गे जाणे जास्तीत जास्त पसंत करतात. कोरपना वरून वणी , वरोरा मार्गे सकाळी ९.१५ , ११.०० व नागपूर वरून परती साठी सायकाळी ५.०० वाजताची बस सुरू केल्यास प्रवाशी दृष्ट्या सुलभ होईल. व प्रवाशांची होणारी ससेहोलपटही थांबेल. याबाबत बऱ्याचदा वणी आगार व्यवस्थापक व यवतमाळ , नागपूर विभागीय नियंत्रक ना निवेदन व विनंती करण्यात आली .परंतु त्याचा काही उपयोग अद्यापही झाला नसून केवळ आश्वासने दिली जाते आहे. यावर आतातरी लक्ष द्यावे अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. ही बस सुरू केल्यास कोरपना, वणी भागातील जनतेला नागपूर हे विभागीय स्थळ असल्याने येथे जाऊन शासकिय कामे व वैद्यकीय समंधी उपचार करण्यासाठी वेळेत जाता येणे शक्य होईल.तसेच इतर प्रवाश्यांना ही बस सेवा सोईस्कर राहील व या मार्गावरील रात्र प्रवासाची बसची अडचण ही दूर होईल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले