WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरात चोरांचा धुमाकूळ....

Image

सीसीटीव्ही ची वायर कट करून आणखी एक धाडसी चोरी...

सुरज चाटे वणी :- वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या जत्रा मैदान रोड ने समर्थ ट्रेडर्स या दुकानाचे सीसीटीव्ही चे वायर कट करून शटर चे कुलूप तोडून चोरांनी दुकानाच्या आत प्रवेश केल्याची घटना दिनांक 9 च्या पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडली असून सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी संबंधित दुकान मालक आले असता त्यांच्या सदर बाब निदर्शनात आली सदर आठवड्यातील वणी शहरात व्यापारी वर्गातील ही चोरीची दुसरी घटना आहे.

वणी शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे एकाच्या वर एक धाडसी चोऱ्या वाढत असून त्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी दिसून येत असून मात्र याला अंकुश लागणार तरी केव्हा व अशा चोरांच्या मुसक्या आवरण्यात वणी पोलिसांना यश येणार का? असा सवाल यावेळी उपस्थित राहत आहे.

वणीतील दीपक चौपाटी परिसरातील तुलसीदास वाधुमल नानवाणी यांचे समर्थ ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान असून त्यात दिनांक 9 ला पहाटे 2 वाजताच्या सुमारास आपला गेम साधून अंधारमय काळोख रात्रीचा सहारा घेत चोरीचा डाव साधला त्यात चक्क दुकानाच्या कडेला लागून असलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन कट करून चोरांनी सदर चोरी केली असून सदर घटनेत किती मुद्देमाल चोरीस गेला हे अजूनतरी स्पष्ट नसून मात्र आपल्या बचावासाठी लावलेला तिसरा डोळा हा सुद्धा चोरांच्या निशाण्यावरच असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे अशा या चोरांच्या मुसक्या वणी पोलीस आवळणार काय? असा सवाल निर्माण झाला असून चोरांना धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली असून सदर परिसरात व्यापारी वर्ग असल्याने याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......