WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पाच वर्षाकरीता वृक्ष तोड वर प्रतिबंध करावा !

Image

पाच वर्षाकरीता वृक्ष तोड वर प्रतिबंध करावा !
ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ
महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीवर दर वर्षी करोडो रुपये खर्च करीत आहे. ह्यांतील किती झाडे जंगली हा वर चौकशी व्हायला हवी तरच ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी होईल . वृक्षारोपण हीं मोहीम सुरू आहे ही अत्यंत चांगली गोष्ट असून मा सुधीरजी मुनगंटीवार मंत्री ह्यांचे कितीही कौतुक केले ते कमी आहे पण हया मोहीमे सोबत पाच वर्षे वृक्ष तोड बंद करण्यात यावी .रात्रीतून जंगलाची अवैध कटाई होत आहे वृत्तपत्रातून बातम्या येत आहे पण ज्या बातम्या आल्या नाही त्या बाबत कोण चौकशी करणार ? आज सागवान ला पर्याय मार्केट मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे सागवान सोबत ईतर वृक्ष तोड वर प्रतिबंध असावा अश्या आशयाची मागणी मा पंप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांचे कडे एका निवेदना द्वारे केली असून दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्या बाबत अभिनंदन करण्यात आले आहे. निवेदनावर ग्राहक प्रहार संघटने चे दामोधर बाजोरीया जिल्हा कार्याध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना , ,डॉ राजेंद्र आत्राम जिल्हा अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना,प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ, जयंत बावणे पाटनबोरी सर्कल प्रमुख ,यशवंत काळे ,सचिन मेश्राम, भैय्यासाहेब ठमके ,नीरज गुरनुले,निलेश वाभीटकर सह अनेकांच्या सह्या आहेत .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.