WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पांढरकवडा चे ठाणेदार अपघातात जखमी

Image

सुरज चाटे वणी :- पांढरकवडा येथील पोलीस निरिक्षक अनिलसिंग गौतम हे अमरावती हुन पांढरकवडा येथे जात असताना बाभुळगाव तालुक्यात काल सकाळी ७ वाजता त्यांचे वाहन निंबाच्या झाडाला धडकले. यात अनिलसिंह गौतम जखमी झाले. प्रसंगावधान राखून एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळला हलविण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले