WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्ह्यातील बँक व फायनान्स कंपनीच्या विरोधात मनसे आक्रमक.....

Image

मनसे राज्य उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे बैठक संपन्न

सुरज चाटे वणी: सततची नापिकी व शासनाच्या खोट्या घोषनामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असता. आर्थिक मदतीसाठी शेतकरी बांधव खाजगी बँक फायनान्सर कडे जातो यावर त्यांनी दिलेल्या कर्जावर अव्वाच्या सव्वा दराने व्याज दर आकारून ही वसुली करत असतांना वसुली अधिकारी सामान्य शेतकऱ्यांना व जनतेस जास्त त्रास देत घरातील महिलांना- सदस्यांना अर्वाच्य भाषा वापरत, घरातील मौल्यवान वस्तू नेत, घराला कुलूप लावून अशी दमदाटी करत असल्यामुळे, सामान्य शेतकरी व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य भयभीत वातावरणात जगत आहेत. याच मुळे काही परिवार मरणाच्या उंबरठ्यावर आहेत.

Image

या संदर्भात मनसे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वसुलीच्या नावावर सामान्य जनतेस त्रास द्याल तर अधिकाऱ्यांचे तंगडी तोडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना देण्यात आल्या. यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी तर्फे इतर कंपन्यांशी पत्रव्यवहार करून सदर बाब निदर्शनास आणून दिली.यानंतर यापुढे असा प्रकार घडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेऊन वसुली अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका राजु उंबरकर यांनी आजच्या बैठकीत मांडली. Image यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,नगरसेवक गजानन भालेकर,सादिक रहमान विकास पवार, संजयदेठे, डेव्हिड शहाणे, शंकर वरघट,सुधाकर झोटिंग,प्रदीप तडस,अभिजीत नानवटकर,संदीप भिसे, सुकांत वंजारी,बबलू मसराम ,दीपक आडे आदी पदाधिकाऱ्यांसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले