WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी राजुर (कॉ) गावचे अजय संजय कंडेवार यांची नियुक्ती

Image

वणी-यवतमाळ जिल्ह्यातील युवा पत्रकार अजय संजय कंडेवार यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी आज दि.१/०८/२०२० रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. दिपक कांबळे यांच्यासह, राष्ट्रीय महासचिव मा. गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मा. प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनार्थ, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा. कमलेश शेवाळे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या सोबत अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत आज मा. अजय कंडेवार यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, पत्रकारांवर होणारे हल्ले असतील, बोकाळलेले अवैध धंदे, गोरगरीबांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणा असेल, अन्यायाच्या विरूद्ध वाचा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही संघटना संपूर्ण देशभरात काम करत आहेत.

या नियुक्ती बद्दल अजय कंडेवार यांना समस्त यवतमाळ , वणी व राजुर ग्रामस्थांकडून तसेच मित्र आणि नातेवाईक परिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......