WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज प्रधानमंत्री आवास योजनेचा धनादेश वितरण व मार्गदर्शन कार्यक्रम......

Image

नागरिकांच्या आशा शिगेला :- केंद्रीय मंत्री, पालक मंत्री, जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती.....

सुरज चाटे :- वणीत काही महिन्या अगोदर प्रधान मंत्री आवास योजनांचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला होता, मोठ्या प्रमाणात नागरिकांनी वणी नगर परिषद येथील प्रधानमंत्री आवास योजनाच्या कार्यालयात अर्ज देखील केले होते आता त्यांच्या प्रयत्नांना यश येत केलेल्या अर्जाची पूर्तता होत असून त्यांना आज दिनांक 6 डिसेंम्बर ला धनादेश तसेच नझुल जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे वाटपाविषयी फॉर्म व आवश्यक कागदपत्राविषयी माहिती देणार असून मोठ्या प्रमाणात जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Image

वणी नगर परिषदे तर्फे प्रधान मंत्री आवास योजना मधील ज्यांच्या घरकूलला मंजुरी मिडाली अशांना धनादेश तसेच अतिक्रमित जमित धारकांना पट्टे व कागदपत्राविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 डिसेंम्बर ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वणीतील शासकीय मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आमदार बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत राहणार आहे.

Image

ज्या नागरिकांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अर्ज केलेला नाही अशा नागरिकांना अर्ज करण्याची संधी या कार्यक्रमात देण्यात येईल असे सुद्धा प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले असून आता नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न शिघेला दिसून येत असून कार्यक्रमात लाभार्थ्यांची एकच गर्दी दिसून येणार असे सुद्धा बोलल्या जात आहे, त्यामुळे वणीतील सर्व नागरिकांनी धनादेश वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन वणी नगरपरिषद चे मुख्यधिकारी संदीप बोरकर व नगरपरिषद चे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी केले आहे.

Image

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR