WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मातृत्व लादणारा संशायित अद्याप मोकाटच, पीडितेला न्यायाची प्रतीक्षा

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगांव-यवतमाळ)

नागपूर येथील विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करित तिच्यावर मातृत्व लादणारा आरोपी विपिन रामाजी दाते हा अजूनही मोकाटच असल्याने त्याला तात्काळ गजाआड करण्याची मागणी पिडीतेने केली आहे.

मारेगांव तालुक्यातील शिवणी धोबे येथील विपिन रामाजी दाते (३०)हा कामानिमित्त नागपूर येथे गेला. नागपुरातील समता नगरात नातेवाईकाकडे वास्तव्य करित असतांना त्या नातेवाईकाच्या विवाहित महिले सोबत सुत जुळविले. परिणामी सदर विवाहित महिला ही पतीच्या सततच्या वादाने कंटाळून माहेरी राहु लागली होती.

या दरम्यान विपिनने लग्नाचे आमिष दाखवित तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून मातृत्व लादले. काही दिवसातच 'तो' स्वतः चे गावी येवून दुसरां संसार थाटण्यासाठी येत्या १०जुन रोजी विवाहाच्या बंधणात अडकणार आहे. मात्र नागपूर येथील पिडीत महिला ही विपिनला वारंवार फोन करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पिडीत महिलेने नागपूर येथील कपिल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन संशायित आरोपीस अटक करण्यात आली नाही. येत्या १० जुन रोजी विपिनचा विवाह सोहळा होणार असल्याने सासुरवाडी की पोलीसवाडीत वास्तव्य होणार याबाबत त्यांच्या मनात खलबत्ते सुरू आहे. या घटनेची मारेगांव पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याने ठाणेदार जगदीश मंडळवार यांनी सांगितले आहे. परिणामी वधुकडील मंडळींना या घटनेचे कुणकुण लागत्याच शुभ मंगलम ''सावधान'' म्हाणण्याची वेळ आली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.