WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीकर अनुभवणार अभूतपूर्व महापारायण सोहळा

Image

सुरज चाटे वणी - रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी वणीकर श्री गजानन विजय ग्रंथाचा अभूतपूर्व असा मुखोद्गगत पारायण महासोह्ळा अनुभवणार आहेत. ठाणे येथील सौ.विद्या पडवळ ( उनवने) या मुख्य पारायणकर्त्या असून त्यांना 3669 ओव्या असलेला पूर्ण ग्रंथ पाठ आहे. Image त्या सलग 8 तास , मध्य॔तरी केवळ पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन या ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 1600 भगिनी पारायणाला बसणार आहेत. या भगिनी विद्याताईंचे पोथी पठण ऐकून स्वतःजवळील पोथीतील ओव्यांवरून दृष्टी फिरवणार आहेत. वरोरा मार्गावरील एस. बी. लाॅन मध्ये या महापारायण सोहळ्याचा आरंभ पहाटे 6.30 वाजता होणार आहे. ठाणे ( मुंबई )येथील विद्याताई पडवळ या एम्.ए. (ऑरगॅनीक केमेस्ट्री व मराठी ) आहेत. त्या उत्तम वक्त्या , कलावंत, कथाकथनकार , व समाजसेविका आहेत. त्यांच्या गजानन विजय ग्रंथाच्या मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम देश विदेशात चालू असतात. वणी शहरात प्रथमच होत असलेल्र्या याअभूतपूर्व कार्यक्रमाला भेट देऊन दुपारी 2 वाजता होणार्या आरतीला उपस्थित राहण्याची संधी भाविक बंधुभगिनींनी सोडू नये अशी विनंती आयोजक श्री गजानन महाराज सेवा समितीने केली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.