WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री संत इस्तारी महाराज मंदिराने पी एम केअ र्स फंडाला रु 20000 केली मदत !

Image

ग्राहक प्रहार संघटनेच्या सुपूर्द केला चेक !

देशात कोरोना ह्या महामारीने देशाला नाक्की नऊ आणून सोडले आहे .देशातील जनता जेव्हा जेव्हा मा पंतप्रधान आव्हान करतात तेव्हा त्यांना साथ देते .मोठ मोठे मंदीर,उधोगपती ,सिनेस्टार, आणि ईतर मा पंतप्रधान ह्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून पैसे जमा करीत आहे ,हे पाहून पांढरकवडा शहरातील प्रगती दुर्गादेवी मंदीर, साई मंदीर, श्री दत्त मंदीर हयानी आर्थिक मदत केली असून ह्याचाच एक भाग म्हणून पांढरकवडा शहरातील प्रसिद्ध श्री संत इस्तारी महाराज मंदिरांचे ट्रस्टी श्री रामापुरे काका ह्यांनी रु 20000 चेक ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर व ग्राहक प्रहारचे अमित एलकुंचवार ह्यांना दिला त्यावेळेस सामाजीक कार्यकर्ते अनुराग रामापुरे प्रामुख्याने उपस्थित होते .

त्यांनी केलेल्या देशकार्या बाबत ग्राहक प्रहारचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा संघटक बंडुभाऊ लवटे ,जिल्हा सल्लागार प्रमुख हनमंतू रजनलवार व अभय निकोडे ह्यांनी अभिनंदन केले असून उदया शासकीय अधिकारी तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांचे सुपूर्द चेक करण्यात येणार आहे !

तालुक्यातील अजून काही मंदीर निधी देणार असल्याची माहिती जिल्हा कोशाध्यक्ष सुनील धवने ह्यांनी दिली आहे !

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले