WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भद्रावतीच्या युवकाला सुपारी व तलवारीसह अटक , वणी पोलीसांची कारवाई

Image

संचारबंदी व जिल्हाबंदिचे उल्लंघन करणे भोवले

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश अशोकराव चौधरी

भद्रावतीच्या युवकाला सुपारी व तलवारीसह वणी पोलीसांनी अटक केली आहे. हि खळबळजनक घटना आज दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे.

कोरोना विषाणु आजाराचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखने करिता लाँकडाउन असल्याने यवतमाळ जिल्हा सिमेवर आज दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन वणी तर्फे पाटाळा पुलाजवळील यवतमाळ जिल्हा सिमेवर नाकाबंदी सुरु असतांना कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता लाँकडाउन दरम्यान यवतमाळ व चंद्रपुर जिल्ह्याचे सिमा बंद असतांना चंद्रपुर जिल्हा सिमेकडुन आरोपी मयुर प्रशांत वाणी(24)रा.भद्रावती जि.चंद्रपुर याने नियमाचे उल्लंघन करुन चंद्रपुर जिल्हा सिमा ओलांडुन अवैद्यरित्या पांढर्या रंगाची महिन्द्रा टि.यु.व्हि 300 हे विनाक्रमांचे वाहन तसेच तोंडाला मास्क न लावता यवतमाळ जिल्हा सिमेमध्ये प्रवेश केल्याने वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये खर्रा बनविणे उपयोगीत येणारी 7 किलो सुपारी अं.कि.4200 रुपये तसेच धारदार लोखंडी तलवार मँनसह अं.किंमत 1 हजार,महिंद्रा टियुव्ही 300 वाहन अं.किंमत 7 लाख रुपये असा एकुन 7 लाख 5 हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.व आरोपी मयुर प्रशांत वाणी यास कारवाई करिता ताब्यात घेतले.

सदर आरोपी याने मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे तसेच राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने त्याचे क्रुत्य 4/25 आर्म अँक्ट सह कलम 188,269,271 भादंवी सह (51)राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 135 वि.पि अँक्ट सह 50(अ)/177एमवि अँक्ट अन्वये होत असल्याने गुन्हा नोंद करुन आरोपिस अटक करण्याच आली.

सदरची कारवाई मा.एम राजकुमार पोलीस अधिक्षक यवतमाळ,मा.नुरुल हसन अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ,सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव पो.स्टे.वणी,सपोनि/नंदकिशोर अहिरे,पोउनि/ प्रफुल डाहुले, डिबी प्रमुख गोपाल जाधव, पोहवा/ सुदर्शन वानोळे,सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे,धिरज चव्हाण,पंकज उंबरकर,प्रमोद मडावी,सुरज गावंडे,अमित पोयाम,दिपक वांड्रवार,मनोज सिंगडवार यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......