WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भात विळखा वाढला, नागपूर-गोंदियात 5 नवे कोरोनाग्रस्त, महाराष्ट्रातील आकडा 136 वर

Image

नागपूर : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भात ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपुरात काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली आहे. तर गोंदियातही एक जण कोरोनाग्रस्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 136 वर गेला आहे.काल सापडलेल्या पाचव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. काल सापडलेल्या पाचव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मेयो आणि मेडिकसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या कर्मचाऱ्यालाही दाखल करण्यात आलं होतं.

काल दिवसभरात 27 कोरोना संशयितांना दाखल करण्यात आलं होतं. 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पाचव्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

नवीन रुग्ण वाढत असतानाच डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, ही मात्र दिलासादायक बाब आहे. परंतु इतक्यात कोरोनाविरुद्ध लढा संपलेला नसल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR