WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीरास उत्कृष्ट प्रतिसाद....

Image

650 रुग्णांना मार्गदर्शन व उपचार.... Image सुरज चाटे वणी :- समता फाउंडेशन मुंबई आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा व संकल्प बहुउद्देशीय संस्था तथा क्रांती युवा संघटना वणी द्वारा आयोजित दिनांक 31 रोज बुधवार ला शेतकरी मंदिर, वसंत जिनिंग वणी येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 650 रुग्णांना याचा लाभ घेऊन तकाही रुग्णांना भरतीची तारीख सुद्धा देण्यात आली.

वणी येथील शेतकरी मंदिर वसंत जिनिंग वणी येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यात नेत्रा संबंधी योग्य मार्गदर्शन तथा आदी विविध योग्य प्रकारे मार्गदर्शन झाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रंगनाथ ना सहकारी पतसंस्था वणी तथा अध्यक्ष वसंत जिनिंग वणी चे अड. देविदास काळे, उदघाटक विजयबाबू चोरडिया अध्यक्ष वर्धमान सोशल आर्गनायझेशन वणी, प्रमुख पाहुणे राजाभाऊ पाथरडकर संचालक वसंत जिनिंग, प्रशांतजी माधमशेट्टीवार विभागीय अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक, राकेशजी खुराणा माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष पुसद अर्बन बँक, निलेशजी कटारिया CA, ओमजी ठाकूर माजी अध्यक्ष व्यापारी असोसिएशन वणी, निकेतजी गुप्ता सामाजिक कार्यकर्ता, अविभाऊ भुजबलराव सामाजिक कार्यकर्ता, आदी उपस्थित होते, यावेळी उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमात झालेल्या सेवे विषयी समाधान व्यक्त करीत त्यांनी सांगितले की, असे कार्यक्रम घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असून क्रांती युवा संघटना तथा संकल्प बहुउद्देशीय संस्था हे असे सामाजिक उपक्रम घ्यावे, यावेळी आम्ही असे विविध सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेता कार्यक्रम करणार व जितकी गोरगरीबांची सेवा सदैव आमची संघटना करीत राहणार असे क्रांती युवा संघटनेचे सदस्य राजू गव्हाणे यांनी यावेळी बोलून दाखविले, या शिबिराची वैशिष्ट्ये शिबिरामध्ये झालेल्या रुग्णांची मोफत आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले, महात्मा फुले जण आरोग्य योजनेत येणाऱ्या शस्त्रक्रिया पूर्णता मोफत, मोती बिंदू असलेल्या रुगणांची मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू असलेल्या व इतर शस्त्रक्रिया रुगणांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू ओपरेशन झालेल्या रुग्णांची ने आण करण्याची राहण्याची व जेवणाची मोफत सोय, रुग्णांची येताना आधार कार्ड, रेशन कार्ड आदी बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन करून त्यांना योग्य सल्ला देण्यात आला, यावेळी 650 हुन अधिक रुग्णांनी उपचार करून घेतला त्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांना कुटुंब कल्याण कार्ड चे सुद्धा वाटप करण्यात आले.

मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना भरतीची तारीख सुद्धा देण्यात आली, या कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम नवघरे यांनी केले, प्रास्ताविक राजूभाऊ गव्हाणे यांनी तर आभार तेजस्विनी राजू गव्हाणे यांनी मानले. या कार्यक्रमात संकल्प बहुउद्देशीय संस्था तथा क्रांती युवा संघटना वणी चे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.